फार्मर आयडी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर
शेतजमिनीचा खाते क्रमांक

फार्मर आयडी कसा मिळवायचा?
नागरी सुविधा केंद्र (CSC)
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)
कृषी सहायक किंवा ग्राम विकास अधिकारी

दोन मिनिटांत आपला आयडी मिळवा
जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी घेतलेला नसेल, तर आजच तुमचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि जमिनीचा खाते क्रमांक घेऊन जवळच्या नागरी सुविधा केंद्रात संपर्क साधा आणि आपला आयडी मिळवा.

जर तुम्ही तुमचा फार्मर आयडी वेळेत घेतला नाही, तर भविष्यात सरकारी अनुदाने, कर्ज किंवा कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळवणे कठीण होईल. त्यामुळे वेळ न घालवता आजच आपली डिजिटल ओळख तयार करून घ्या आणि शेतीच्या आधुनिक सुविधांचा लाभ घ्या.