आनंदाची बातमी.! आता तलाठी कार्यलयात जाण्याची गरज नाही मिळणार आता या ऑनलाइन सेवा

नमस्कार मित्रांनो शासनाने ई-हक्क प्रणाली सुरू केली असून, त्याअंतर्गत अकरा विविध सेवा ऑनलाइन पुरविल्या जात असल्याने वारसनोंद, ई-करार, कर्जाचा बोजा चढविणे आदी कामांसाठी शेतकर्‍यांना यापुढे तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये झाले जमा येथे बघा तुमच्या खात्यात आले का

या वेळी तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते. नावडकर यांनी 100 दिवस उपक्रमांतर्गत राबविलेल्या विविध कार्यक्रमांची या वेळी सविस्तर माहिती दिली. ई-हक्क प्रणालीद्वारे 11 प्रकारच्या सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. महा-ई-सेवा केंद्राद्वारे नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतात, असे नावडकर यांनी स्पष्ट केलेबारामती व इंदापूर तालुक्यात सात-बारा उतार्‍यातील अडचणी, फेरफार नोंदींचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. बारामतीत फेरफार नोंदी 19 दिवसांत, तर इंदापुरात 21 दिवसांच्या आत होत आहेत. ई-हक्क प्रणालीद्वारे बारामतीत 1817, तर इंदापुरात 758 अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच दाखल झाल्याचे ते म्हणालेशासनाने शेतकर्‍यांना युनिक फार्मर आयडी देण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये झाले जमा येथे बघा तुमच्या खात्यात आले का

 

त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कर्ज किंवा इतर कामांसाठी इतर उतारे देण्याची गरज लागणार नाही. या आयडीद्वारेच शेतकर्‍यांची सर्व कामे होतील. यात अधिकाधिक शेतकर्‍यांचा सहभाग अपेक्षित आहे.सध्या बारामती तालुक्यात 49 हजार 994, तर इंदापुरात त 26,160 शेतकर्‍यांनी यात सहभाग नोंदविला आहे. पीएम किसान योजनेतील सर्व शेतकर्‍यांनी हे कार्ड काढावे, असे आवाहन नावडकर यांनी केले. बारामती तालुक्यात पीएम किसान योजनेंतर्गत 30,683 तर इंदापुरात 60,320 शेतकर्‍यांची नोंदणी आहे.संजय गांधी निराधार अनुदान व तत्सम योजनांचा लाभ यापुढे थेट लाभार्थ्यांना बँक खात्याद्वारे दिला जात आहे. बारामती तालुक्यात 11,351 लाभार्थी आहेत. त्यापैकी 9,485 लाभार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांची आधार जोडणी तहसील कार्यालयात केली जात आहे. लाभार्थ्यांनी आधार जोडणी करून घ्यावी. जे जोडणी करून घेणार नाहीत, त्यांच्या खात्यात ही रक्कम येणार नाही, असे तहसीलदार गणेश शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment