या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च आहे.

स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in याबाबत माहिती देण्यात आली आहे. या भरती मोहिमेत मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स, एफएलसी काउंसलर्स आणि एफएलसी डायरेक्टर्स पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.स्टेट बँकेत २६३ पदे ही एफएलसी काउंसलर्स पदासाठी आहेत. तर एफएलसी डायरेक्टर्ससाठी ६ पदे आहे. रिटेल प्रोडक्ट्स मॅनेजर पदासाठी ४ जागा रिक्त आहेत.

एसबीआयमधील या नोकरीसाठी विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए, पीजीडीएम, पीजीपीएम, एमएमएस पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असावा.

एफएलसी काउंसलर आणि एफएलसी डायरेक्टर पदासाठी रिटायर्ड ऑफिसर अर्ज करु शकतात. २८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. मेरिट लिस्टनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. एसबीआयमधील रिटेल प्रोडक्ट्स मॅनेजर पदासाठी १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. एफएलसी काउंसलर्स पदासाठी ५०,००० रुपये तर एफएलसी डायरेक्टर पदासाठी ७५००० रुपये पगार मिळणार आहे.

स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करा अन् फॉर्म भरा. यानंतर शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा. या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.