महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात १०वी/पदवीधर/ आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. MSRTC द्वारे या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एसटी महामंडळात व्होकेशनल (अकाउंट्स आणि ऑडिटिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मेकॅमिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.

एसटी महामंडळातील या नोकरीसाठी १४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग असणार आहे. तुम्हाला नाशिकमध्ये जावे लागणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज सादर करताना अर्जासोबतच तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र द्यावे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर आधी रजिस्टर करावे लागेलय त्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. १७ मार्च २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.