अंगणवाडी सेविका पदासाठी एकूण ५६३९ जागा रिक्त आहेत. तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी १२३४२ पदे रिक्त आहेत. एकूण १८८८२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहेत.

अंगणवाडीतील या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३५ असणे गरजेचे आहे. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या त्यांच्याच स्थानिक परिसरात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त २ मुले असावीत

तसेच या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शिक्षण १२वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कार्यालयीन वेळेत अर्ज करु शकतात. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करायचा आहे.