ई-केवायसी करण्यासाठी, सर्वप्रथम Google Play Store वरून “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे. त्यानंतर “Mera e-KYC Mobile App” उघडून आपले राज्य आणि जिल्हा निवडावा. आधार क्रमांक प्रविष्ट करून प्राप्त झालेला OTP संबंधित ठिकाणी टाकावा. आवश्यक माहिती भरल्यानंतर “सबमिट” बटण दाबावे. त्यानंतर “Face e-KYC” पर्याय निवडून, सेल्फी कॅमेरा सुरू करून डोळे उघडझाप करून फोटो काढावा. ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर “e-KYC पूर्ण” झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.
संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व रेशनकार्डधारकांना 30 मार्चच्या आत ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ही प्रक्रिया आता मोबाईल अॅपच्या मदतीने घरबसल्या सहज पूर्ण करता येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी दिली आहे