शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना जिल्ह्यानुसार नुकसान भरपाई झाली जाहीर यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर (Unseasonal rain) नुकसान झालं होतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेती पिकांचे (Crop Damage) नुकसान झाले होते.या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना सरकार देणार डबल गिफ्ट या दिवशी हप्ता खात्यात जमा होणार

यात अकोला, बुल बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहेयाबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः सप्टेंबर ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पुर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता 733 कोटी 45 लाख 84 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना सरकार देणार डबल गिफ्ट या दिवशी हप्ता खात्यात जमा होणार

 

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या ठाणे जिल्ह्यातील 109 शेतकऱ्यांना 03 लाख 02 हजार रुपये, पालघर जिल्ह्यातील 2730 शेतकऱ्यांना 9 कोटी 67 लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील 113 शेतकऱ्यांसाठी तीन लाख 25 हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 61 बाधित शेतकऱ्यांना 01 लाख 21 हजार रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 196 शेतकऱ्यांना 05 लाख 2 हजार रुपये वितरित करण्यात येईल. अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात 155 बाधित शेतकऱ्यांना 89 लाख 17 हजार रुपये, अकोला जिल्ह्यातील 14706 शेतकऱ्यांना 22 कोटी 73 लाख, यवतमाळ जिल्ह्यातील 925 शेतकऱ्यांना 48 लाख बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख 37 हजार 296 शेतकऱ्यांना 300 कोटी 35 लाख वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना 47 हजार रुपये करण्यात आला आहे. पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील 932 शेतकऱ्यांसाठी 68 लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील आठ हजार 199 शेतकऱ्यांना आठ कोटी पाच लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये, तसेच नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात 16 शेतकऱ्यांना एक लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील 1541 शेतकऱ्यांना 93 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 316 शेतकऱ्यांना 36 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील 1540 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये, तर अहमदनगर जिल्ह्यातील 1224 शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Leave a Comment