शेतकऱ्यांना फार्मर आयडी नंबर मिळायला झाली सुरुवात अशा प्रकारचे चेक करा तुमचे आयडी स्टेटस March 1, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. यासाठी अॅग्रिस्टॅक या योजनेत नावनोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. येथे क्लिक करून बघा कसे चेक कराल अर्जाचे स्टेटस? राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती एकत्रित असावी, हा योजेनेचा उद्देश असून, राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे. शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत.सरकारी योजनांचा लाभ सहजरीत्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. मध्यस्थांची भूमिका कमी करणे. आयडी तयार झाल्यानंतर, शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच पीएम किसान योजनेची पडताळणी देखील सोपी होणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे.अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा मेसेज यायला सुरवात झाली आहे. तुम्हाला हा मेसेज आला नसेल आणि तुमच्या फार्मर आयडीच्या अर्जाची स्थिती त्याचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर ते कसे पहायचे ते सविस्तर पाहूया. येथे क्लिक करून बघा कसे चेक कराल अर्जाचे स्टेटस?