लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! होळीला मिळणार लाडक्या बहिणींना ही मोठी भेट February 25, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अर्जांची छाननी केल्यानंतर, आता फेब्रुवारी महिन्याचा आठवा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांना लवकरच देण्यात येईल.तसेच, राज्यातील लाडक्या बहिणींना होळीच्या दिवशी एक भेट मिळणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या महायुती सरकारने आता महिलांसाठी आणखी एक खास भेट आणली आहे. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून 1500 रुपये झाले जमा यादीत नाव तपासा होळीनिमित्त राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना साड्या देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना अंत्योदय शिधापत्रिकाधारक (अंत्योदय रेशन कार्डधारक) महिलांसाठी लागू असेल. राज्य पुरवठा विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले आहे. तसेच भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार महिलांसाठी सतत कल्याणकारी योजना आणत आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना राज्य परिवहन (एसटी) बसमध्ये अर्ध्या भाड्याने प्रवास करण्याची परवानगी दिली होती. यानंतर, विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून 1500 रुपये झाले जमा यादीत नाव तपासा या योजनेला प्रचंड पाठिंबा मिळाला आणि महिलांनी महायुती सरकारच्या बाजूने प्रचंड मतदान केले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने होळीनिमित्त गरीब महिलांना मोफत साड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींना साड्या भेट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले जात आहे. ते प्रत्येक तालुक्यातील सरकारी रेशन दुकानांमध्ये पोहोचवले जात आहे. होळीपूर्वी, सर्व लाभार्थी महिलांना प्रत्येकी एक साडी दिली जाईल.