ई-हक्क पोर्टलला भेट द्या आणि खाते उघडा.
वारस नोंदणी फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सादर केल्यानंतर १८ दिवसांत त्याची पडताळणी केली जाते.
सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यास वारसाचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवले जाते.
वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे
मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड
पत्ता पुरावा
अर्जदाराच्या ओळखीचा अधिकृत दस्तऐवज
आवश्यक असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र
वारसांचे प्रतिज्ञापत्र
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
जर मृत व्यक्ती सरकारी सेवेत कार्यरत असेल, तर संबंधित सेवा नियमावली व सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वारस नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नवीन नाव समाविष्ट करण्याची किंवा मृत व्यक्तीचे नाव हटवण्याची सुविधा देखील ऑनलाइनच उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, बोजा चढवणे-कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, तसेच सातबारावरील चूक दुरुस्त करणे यासारख्या सेवा देखील ई-हक्क प्रणालीमध्ये जोडल्या गेल्या आहेत.
नवीन प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा
फक्त 25 रुपयांत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ही प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि सुटसुटीत झाली आहे. अनावश्यक दिरंगाई आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी डिजिटल पद्धतीचा उपयोग केल्याने महसूल विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षम झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या नवीन ऑनलाइन प्रणालीचा लाभ घ्यावा आणि वारस नोंदणी व सातबारा उताऱ्यावर नाव चढवणे-काढण्याची प्रक्रिया सोयीस्कर पद्धतीने पूर्ण करावी.