मोठी खुशखबर आता घरबसल्या करता येणार मोबाईल वरून वारस नोंदणी असा करा अर्ज February 24, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने वारस नोंदणी आणि सातबारा उताऱ्यावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवीन डिजिटल प्रणाली लागू केली आहे. या सुधारित प्रणालीमुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज राहणार नाही.संपूर्ण प्रक्रिया आता ई-हक्क पोर्टलद्वारे ऑनलाइन उपलब्ध झाली असून, नागरिकांना फक्त 25 रुपये शुल्क भरून घरबसल्या अर्ज करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्यासोबतच भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे येथे क्लिक करून बघा वारस नोंदणी साठी अर्ज कसा करायचा .एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर, त्याच्या नावावर असलेली शेतजमीन किंवा इतर स्थावर मालमत्ता कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित करण्यासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे असते. मृत व्यक्तीच्या पत्नी/पती, मुलगा, मुलगी किंवा आई यांना मालमत्तेचा हक्क मिळवण्यासाठी मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे.ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच सातबारा उताऱ्यावर नवीन वारसांचे नाव अधिकृतपणे चढवले जाते.पूर्वी ही प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांना तलाठी आणि तहसील कार्यालयात जावे लागायचे. मात्र, महसूल विभागानेआताhttps://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे येथे क्लिक करून बघा वारस नोंदणी साठी अर्ज कसा करायचा