PM किसान योजनेचा हप्ता मिळालाय की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवरील ‘Farmer Corner’ वर क्लिक करा.
‘Beneficiary Status’ पर्याय निवडा.
रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा कोड टाका आणि ‘Get OTP’ वर क्लिक करा.
रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा.
तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही, याचा तपशील पाहता येईल.
पीएम किसान योजनेअंतर्गत मानधन मिळविण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटच्या मदतीने, शेतकरी हे काम घरी बसून त्यांच्या स्मार्टफोनवरून करू शकतात. यासाठी तुम्हाला पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. येथे फार्मर कॉर्नर असे लिहिलेले दिसेल. या खाली e-KY चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. असे केल्याने, पीएम किसान खात्याशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तुम्ही नियुक्त केलेल्या ठिकाणी हा OTP भरताच तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होईल.