शेत जमिनीची वाटणी करत असाल तर ही माहिती नक्की वाचून घ्या

नमस्कार मित्रांनो भारतातील अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये शेतीची जमीन आजही वडील किंवा आजोबांच्या नावावर नोंदवलेली असते.त्यामुळे वारसांमध्ये जमिनीच्या मालकीसंबंधी वाद उद्भवू शकतात,ज्यामुळे शेतीच्या वाटणीची गरज निर्माण होते.मात्र,शेतीच्या जमिनीचे कायदेशीर वाटप कसे होते?कोणते कायदे लागू होतात? याबाबत अनेकांना संपूर्ण माहिती नसते

 

हे सुद्धा वाचा:- उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 2 हजार रुपये जमा यादीत नाव बघा 

 

. याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.जर जमीनधारकाचा मृत्यू झाला आणि त्याने मृत्यूपत्र तयार केलेले नसेल,तर ती मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित केली जाते. यामध्ये प्रामुख्याने पत्नी आणि मुलांचा समावेश असतो. वारसांना या जमिनीच्या नोंदणीसाठी तलाठ्याकडे अर्ज करावा लागतो. जर सर्व वारसांनी एकत्रित मालकी स्वीकारली, तर त्यांची नोंद एकत्र केली जाते.मात्र,प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हवी असल्यास, खातेफोड प्रक्रियेचा अवलंब करता येतो.जर सर्व वारसांची संमती नसेल, तर त्यासाठी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो.शेतीच्या जमिनीच्या वाटणीसाठी वारसदार तहसीलदार किंवा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात.

हे सुद्धा वाचा:- उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 2 हजार रुपये जमा यादीत नाव बघा 

 

जमिनीचा वारस असल्याचे प्रमाणपत्र
वारस नोंदणीचा अर्ज
मिळकत नोंदणी कागदपत्रे
अर्ज दाखल केल्यानंतर,सर्व वारसांना नोटीस बजावली जाते आणि त्यांची बाजू ऐकली जाते. कागदपत्रांची शहानिशा करून न्यायालय जमिनीच्या वाटणीबाबत अंतिम निर्णय देते.न्यायालयाने जमिनीच्या वाटणीसंबंधी आदेश दिल्यानंतर गाव तलाठ्याला जमीन वाटणीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले जातात.तलाठी उपलब्ध जमीन आणि वारसांची संख्या यानुसार प्रत्येकी किती वाटा मिळणार याचे नियोजन करतो.
यात प्रत्येक वारसाला स्वतःच्या जमिनीपर्यंत रस्ता मिळेल याचीही खात्री केली जाते.
सर्व वारसदारांची संमती घेतल्यानंतर महसूल विभाग अंतिम मंजुरी देतो. जर वारसांना तलाठ्याचा प्रस्ताव मान्य नसेल,तर अंतिम निर्णय महसूल अधिकारी किंवा न्यायालयाकडून घेतला जातो.

दरम्यान, शेतीच्या जमिनीचे वाटप करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सर्व वारसांची सहमती असल्यास प्रक्रिया सोपी होते,मात्र वाद उद्भवल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक ठरतो. त्यामुळे जमिनीच्या वाटणीबाबत स्पष्ट नियम समजून घेऊन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

 

Leave a Comment