मोठी बातमी या लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये जमा होणार नाही

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार, याकडे लक्ष लागलं असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार नसल्याची मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- शेळी पालनासाठी सरकार देणार 90 टक्के अनुदान अशा प्रकारे करा अर्ज येथे क्लिक करा

राज्यात लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र, आता महायुतीसरकारने निकषांची कात्री लावली आहे. त्यामुळे योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. राज्यभरात अंगणवाडी सेविकांकडून छाननीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली.

हे सुद्धा वाचा:- शेळी पालनासाठी सरकार देणार 90 टक्के अनुदान अशा प्रकारे करा अर्ज येथे क्लिक करा

 

साधारण 2 कोटी 11 लाख 860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र, या योजनेतील अपात्र महिलांची संख्या आणखी वाढणार आहे. महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांकडून छाननी प्रक्रिया सुरू असून फेब्रुवारी महिन्यात आणखी जवळपास 2 लाख महिला अपात्र ठरणार आहे. या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नसल्याचे समजते.

Leave a Comment