- लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य केले आहे.
- राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- ‘लाडकी बहीण योजने’वर आता आयटीची नजर आहे. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार आहे.
- लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार आहे.
- अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
- जिल्हास्तरावरून फेरतपासणी करुन निकषात न बसलेल्यांना अपात्र करण्यात येणार आहे.
लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे. ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.