नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची समजली जाणारी पीक विमा योजना (Pik Vima Yojana) सध्या अधिक लोकप्रिय बनली आहे. परंतु आता याच योजनेमध्ये काही मोठे बदल होणार आहेत.नवीन प्रस्तावानुसार, एक रुपयांत मिळणारा विमा 100 रुपयांत देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

हे सुद्धा वाचा:- घरबसल्या काढता येणार आता आधार कार्ड अशाप्रकारे करा नोंदणी येथे बघा
मात्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक रुपयांतच विमा सुरू ठेवण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पीक विमा योजनेत बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने सरकारला अहवाल सादर केला आहे. यामध्ये विमा योजनेच्या सध्याच्या स्वरूपामुळे सरकारवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे म्हणले आहे. जर हे निकष कायम ठेवले तर सरकारला 400 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागतील. यामुळेच सरकार विम्याची रक्कम वाढवण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी मोठी मदत करणारी योजना आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते.
हे सुद्धा वाचा:- घरबसल्या काढता येणार आता आधार कार्ड अशाप्रकारे करा नोंदणी येथे बघा
तसेच, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ, आर्द्रता, तापमानातील बदल यामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी पिक विमा योजना मदत करते. प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही 2020 पासून सुरू आहे. या योजनेचा हेतू अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी खर्चात विमा देण्याचा आहे.सध्या राज्यातील 1.71 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. यापैकी 85 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडू नये, यासाठी सरकारने योजनेतील काही महत्त्वाचे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार, मोठ्या शेतकऱ्यांसाठी विम्याचा हप्ता वाढवला जाईल, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल.