योजनेसाठी पात्रता काय ?
* मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी गॅस जोडणी महिलेच्या नावे असणे आवश्यक आहे.
* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थ्यांचे कुटुंब योजनेसाठी पात्र असणार आहे. या कुटुंबास मोफत तीन वेळा सिलिंडर पुनर्भरण करुन मिळेल.
* कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेली गॅस जोडणी लाडकी बहिणीला स्वतःच्या नावे करून घ्यावी लागणार आहे. एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल.

७५ हजार उज्ज्वला गॅस जोडणी
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत केले जाते. जिल्ह्यात उज्ज्वला गॅस जोडणीधारकांची संख्या ७५ हजार ४०८ एवढी आहे.
धुरापासून होणार मुक्तता
काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरे सिलिंडर येईपर्यंत स्वयंपाकासाठी साधन उपलब्ध होत नाही. परिणामी चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. आता वर्षभरात ३ सिलिंडर मिळणार असल्याने धुरापासून मुक्तता मिळणार आहे.
३,०७,२९० लाडक्या बहिणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३ लाख २४ हजार ४१४ लाभार्थ्यांनी पोर्टल व ॲपच्या माध्यमातून अर्ज केले होते. यापैकी ३ लाख ७ हजार २९० अर्ज पात्र ठरले असून या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे.