विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आवाहन सरकारने केले होते. त्यानंतर आता महिला २१०० रुपयांच्या प्रतिक्षेत होत्या. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेआता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे.
एकीकडे महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये देण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने अद्याप २१०० रुपयांबाबत कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची अंबलबजावणी होण्यासाठी किमान तीन-चार महिने तयारी करावी लागते. त्यामुळे मार्च महिन्यात तरी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी नियम डावलून योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत. या ५ लाख महिलांमध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांचा समावेश आहे. तसेच अनेक महिला इतर अनेक योजनांचाही लाभ घेतला आहे. त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहे.