मुलासाठी आधार कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रौढांपेक्षा थोडी वेगळी असते. यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात. ऑनलाईन अर्ज करत असल्यास UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. पालकांच्या आधारद्वारे विचारलेला आधार नोंदणी फॉर्म आणि इतर तपशील भरावा लागले. ऑनलाईन अर्ज करताना मुलांचे बायोमेट्रिक तपशील नोंदवले जात नाहीत. नावनोंदणीसाठी मुलांचा स्पष्ट फोटो, मुलाचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागते. पालकांच्या आधार कार्डवरून इतर डिटेल्स घेतल्या जातात. अर्ज नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर नोंदणी स्लिप जनरेट होते. यात नावनोंदणी क्रमांक असतो. फॉर्म सबमिट केल्यानंतर काही दिवसांतच नावनोंदणीच्या वेळी दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पोस्टाद्वारे पाठवले जाते. साधारण 90 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण हो