मुख्यमंत्री फडणवीस यांची नवीन योजना.! लाडकी बहिण योजने नंतर आता लखपती दीदी योजना सुरू

नमस्कार मित्रांनो राज्यात आगामी कालावधीत 1 कोटी लखपती दीदी करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत ही संख्या 25 लाखापर्यंत नेली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले

 

.ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने 11 ते 23 फेब्रुवारीदरम्यान येथील वांद्रे-कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन’चे आयोजन करण्यात आले आहे.

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना होणार मोफत साडी वाटप येथे क्लिक करून बघा पात्र महिला कोणत्या

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी’ही योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना ‘लखपती दीदी’ म्हटले जाते. आज महाराष्ट्रात 11 लाखापेक्षा जास्त ‘लखपती दीदी’आहेत. लवकरच 25 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा सरकारचा संकल्प आहे. याशिवाय नजीकच्या कालावधीत 1 कोटी महिला लखपती दीदी करण्याचा आमचा निर्धार आहे. बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना होणार मोफत साडी वाटप येथे क्लिक करून बघा पात्र महिला कोणत्या

 

राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, लाडकी बहीण योजना, एसटीमध्ये प्रवास सवलत यांसह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत. लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी उपस्थित महिलांना दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.

Leave a Comment