तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळेल की नाही हे जर तपासायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.
यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.नंतर ‘शेतकरी कॉर्नर’ विभागात जा आणि लाभार्थी यादीवर क्लिक करा. पुढे जाऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या राज्याचे, जिल्हाचे, तहसीलचे आणि गावाचे नाव टाका. आणि Get Report बाटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला दिसणाऱ्या यादीत तुमचे नाव दिसेल.