आवश्यक कागदपत्रे

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा योजनेसाठी अर्ज करताना शासनाने ठरवून दिलेली काही महत्त्वाची कागदपत्रे अर्जदाराने सादर करणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे

आधार कार्ड, रेशन कार्ड

रहिवासी दाखला

अर्जदाराचे जमिनीचा सात बारा

अर्जदाराच्या जमिनीचा अट अ

मोबाईल नंबर

ई-मेल आयडी

पासपोर्ट साईजचे दोन फोटो

स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र

जातीचा दाखला

असा करा ट्रक्टर अनुदानासाठी अर्ज

ट्रॅक्टर सारखे अवजारे शेतीसाठी खुप उपयोगी असतात. परंतु ते अतिशय महाग असल्याने अनेक शेतकरी इच्छा असुनही ते खरेदी करु शकत नाही. त्यामुळे शासनाने आता शेतकऱ्यांसाठी ५० टक्के व ४० टक्के याप्रमाणे अनुदान देत आहे. तुम्ही जर शेतकरी असाल किंवा तुमच्या ओळखीत कुणी शेतकरी असेल तर त्यांच्यापर्यत ही माहिती जरुर पोहचवा. परंतु त्यासाठी तुम्हांला महाडीबीटी या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी लागेल

महाडीबीटी या वेबसाईटवर नोंदणी केली कि मग तुम्हांला युजर आयडी व पासवर्ड मिळतो. त्याद्वारे लॉगीन करुन तुम्ही ट्रॅक्टर सहित विविध योजनांचा लाभ घेवु शकता. तसेच जर तुम्ही महाडीबीटी वेबसाईटवर तुषार, ठिंबक किंवा इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला असेल तर पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागत नाही tractor anudan yojana 2024 . ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवघ्या 10 मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागु शकतो जर वेबसाईट सुरळीत सुरु असेल तर. महाडीबीटी वेबसाईटची लिंक पुढीलप्रमाणे- https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AD61F6F45B7D0D582