एचडीपीई पाईपसाठी प्रति मीटर ५० रुपये अनुदान
पीव्हीसी पाईपसाठी प्रति मीटर ३५ रुपये अनुदान
एचडीपीई लाईन विनाइल फॅक्टरसाठी प्रति मीटर २० रुपये अनुदान
पाइपलाइन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
सातबारा उतारा
आधार कार्ड
बँक पासबुक (अर्जदाराच्या नावावर असावे)
रहिवासी दाखला
पाणीपुरवठ्याचा पुरावा (अर्जाच्या आवश्यकतेनुसार)
तसेच, अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा निवासी असावा आणि त्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. योजनेचे अन्य पात्रता निकष देखील महाडीबीटी पोर्टलवर तपासता येतील.
अर्ज प्रक्रिया सुरु करण्यासाठी, शेतकऱ्यांनी या mahadbtmahait.gov.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन किंवा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘NFSM पाईप अनुदान योजना’ निवडून अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. अर्जाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे, तसेच संदर्भ क्रमांक देखील सुरक्षित ठेवावा. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज लवकर करा आणि अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणी करा. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आधुनिक सिंचन पद्धती वापरून शेती उत्पादनात वाढ करण्याची संधी मिळवावी.