स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे असावी. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झाली आहे.

व्यवस्थापक डेटा सायंटिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई / बी.टेक / एम टेक इन कॉम्प्युटर सायन्स / आयटी /इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत एमबीए आणि पीजीडीएम केलेल्या प्राधान्य दिले आहे.

उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई / बी.टेक / एम. टेक इन कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. स्टेट बँकेत ४३ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. मुंबई येथे ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरायची आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.