सरकारकडून देण्यात येणारी ही रक्कम महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या योजनेच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहतात.सध्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, याकडे महिला आतुरतेने पाहत आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत हा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असल्याने पैसे 20 तारखेला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, इतर महिन्यांच्या हप्ते वेळेत जमा झाल्यामुळे महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा हप्ता येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत खात्यात जमा होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.(Ladki Bahin Yojana) ही तारीख जाहीर झाल्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.