लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला हा मोठा निर्णय नवीन शासन निर्णय झाला जाहीर February 6, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या तिजोरीत निधीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक महत्त्वाच्या योजना बंद करण्याचा विचार सुरू आहे. शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यांसारख्या लोकप्रिय योजनांवर टाच आणली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अशा परिस्थितीतही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या प्रचारासाठी तीन कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. हे सुद्धा वाचा:- जमीन खरेदी विक्रीच्या नियमात झाले मोठे बदल आता अशा प्रकारे करावे लागणार नोंदणी महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून देणाऱ्या ‘लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून आतापर्यंत महिलांच्या खात्यात 10,500 रुपये जमा झाले आहेत. हे सुद्धा वाचा:- जमीन खरेदी विक्रीच्या नियमात झाले मोठे बदल आता अशा प्रकारे करावे लागणार नोंदणी आता या योजनेच्या डिजिटल आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी प्रत्येकी दीड कोटी, असा एकूण तीन कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.महायुती सरकारने याआधीच प्रचारासाठी 200 कोटी रुपयांच्या माध्यम आराखड्यास मान्यता दिली होती. त्यानुसार माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाने जाहिरात प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले आहेत.