लाडकी बहि‍णींची फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार? 1500 की 2100 रुपये मिळणार ? येथे बघा

नमस्कार मित्रांनो सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात

 

 

हे सुद्धा वाचा:- मोदी सरकार देणार लाडक्या बहिणींना 7 हजार रुपये असा करा अर्ज

 

.जानेवारी महिन्याचा हप्ता याआधीच देण्यात आला असून, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट सर्वजणी पाहत आहेत. हा हप्ता नेमका कधी येणार आणि तो १,५०० रुपये असेल की २,१०० रुपये, याबाबत मोठी उत्सुकता आहेयोजनेच्या फेब्रुवारी हप्त्याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा:- मोदी सरकार देणार लाडक्या बहिणींना 7 हजार रुपये असा करा अर्ज

 

 

फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने २० तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो, असे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.गेल्या तीन महिन्यांपासून हप्ता शेवटच्या आठवड्यातच जमा केला जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातही २५ ते २८ तारखेच्या दरम्यान पैसे येण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या मदतीचा रकमेचा वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. या वाढीबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा सुरू आहे.योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून, सरकारकडून लाभार्थ्यांची नावे पडताळणी प्रक्रियेअंतर्गत तपासली जात आहेत. त्यामुळे लाडकी बहिणींसाठी पुढील महिन्यांमध्ये काही महत्त्वाच्या बदलांची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment