मोठी बातमी.! आठवड्यात राहणार आता फक्त 5 दिवस बँक सुरू? वेळ आणि नियम बदलणार

नमस्कार मित्रांनो तुम्ही बँकेत कामासाठी जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, आधीच फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसांपैकी शनिवार रविवार पकडून 13 दिवस बँक बंद राहणार आहे. ह्या सुट्ट्या प्रत्येक राज्यांनुसार वेगवेगळ्या आहेत.आता बजेटमध्ये बँकेच्या कामाच्या तासांबद्दल महत्त्वाची घोषणा होऊ शकते

 

हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार उपमुख्यमंत्री यांची मोठे घोषणा

.बँक कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुट्टी द्यावी आणि 5 दिवसांचा आठवडा करावा ही मागणी कर्मचारी मागच्या काही वर्षांपासून करत होते. आता यावर बजेटमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.सध्या बँक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहते. बँक कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बँका आठवड्यातून फक्त पाच दिवस सुरू राहतील. देशातील करोडो बँक ग्राहकांसाठी बँक शाखा उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ बदलणार आहे, कामाचे तास वाढतील आणि पाच दिवसांचा आठवडा केला जाऊ शकतो. अर्थसंकल्पातील या महत्त्वाच्या निर्णयाला सरकार मान्यता देते की नाही, हे 1 फेब्रुवारीला कळणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.बँक कर्मचारी आणि संघटना अनेक दिवसांपासून सरकारकडे पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करत आहेत. जर या निर्णयाला मंजुरी मिळाली तर बँक कर्मचाऱ्यांना दररोज शाखेत 40 मिनिटे जादा काम करावं लागेल. त्यानंतर दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी बँकांच्या शाखा बंद राहतील. आतापर्यंत बँकांमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम होते. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहात होत्या.बँक कर्मचारी एका महिन्यात 6 सुट्ट्यांऐवजी 8 सुट्ट्यांची मागणी करत आहेत

हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार उपमुख्यमंत्री यांचे मोठे घोषणा

 

. यासाठी बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात करार झाला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण सरकार आणि आरबीआयच्या मंजुरीची वाट पाहात आहेत. बँक कर्मचारी संघटना, आरबीआय आणि सरकारी अधिकारी यांच्यात बँकांमध्ये 15 दिवस काम करण्याबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाला आरबीआय आणि सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यानंतरच देशातील सर्व बँकांमध्ये 5 दिवस काम 2 दिवस सुट्टी हा नियम लागू होईल.बँकिंग कामकाजाच्या तासात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना सेवा मिळण्यात अडचण येणार नाही, असा दावा युनियनकडून करण्यात आला आहे. 5 दिवस बँकांमध्ये काम केल्यामुळे लोकांना त्यांचे काम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. विशेषत: जे काम करत आहेत, जे शनिवारी आपले काम पूर्ण करतात. त्यांना काम पूर्ण करण्यासाठी शनिवार मिळणार नाही. केवळ 5 दिवसांच्या आत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

Leave a Comment