दरम्यान ऑनलाईन अर्जासाठी https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. याच वेबसाईटवर 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी सोडून समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे

अटी व शर्ती
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत
स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
तसेच अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.
ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधानांच्या खरेदीवर रु ३.१५ लाख शासकीय अनुदान अनुजेय राहील.
ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.