आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला आहे. आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही.पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे.गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांना मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रात आणखीण गोड होणार आहे.दरम्यान पुढच्या आठवड्यात 14 जानेवारीला मकरसंक्रात आहे. याच मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहीणचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता लागली आहे.