आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही थेट पोर्टलवर किंवा तुमच्या क्षेत्रातील कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. कारण तुम्ही कर्जासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास व्हेरिफिकेशनसाठी त्याची गरज लागेल.
आधार कार्डवर कर्ज घेण्यासाठी काय पात्रता आहेत?
कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडून शिफारस पत्र घ्यावे लागेल. जेणेकरुन त्यांना भविष्यात सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. या योजनेअंतर्गत, कर्ज घेणाऱ्यांच्या चार श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी, व्यक्तींनी पोर्टलवर त्यांची पात्रता स्थिती तपासली पाहिजे.
कर्जावर किती व्याज द्यावे लागेल?
व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB), लघु वित्त बँका (SFBs) आणि सहकारी बँकांचे व्याजदर सध्याच्या दरांनुसार असतील. तर एनबीएफसी, एनबीएफसी-एमएफआई इत्यादींसाठीचे व्याजदर त्यांना दिलेल्या RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरवले जातील. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत समाविष्ट नसलेल्या इतर कर्जदारांच्या श्रेणींसाठी, NBFC-MFI साठी सध्याच्या RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्याजदर निर्धारित केले जातील.