अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल आणि उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. ही भरती परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) आणि कौशल्य चाचणी/टायपिंग चाचणी अशा दोन टप्प्यांत घेतली जाईल. दोन्ही टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांनाच अंतिम निवड प्रक्रियेत सहभागी होता येईल. याशिवाय उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्जाचे शुल्कही भरावे लागेल.या भरतीशी संबंधित महत्त्वाची माहितीसाठी जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. महत्त्वाचे निकष तपशीलवार समजून घेण्यासाठी रेल्वेने जारी केलेली अधिसूचना तपासा.