. ऑनलाइन पद्धत:
UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर (https://myaadhaar.uidai.gov.in/) जा.
“Document Update” पर्याय निवडा.
आधार नंबर टाका, कॅप्चा कोड भरा आणि “Send OTP” क्लिक करा.
ओटीपी टाकून लॉगिन करा आणि अपडेट करायची माहिती निवडा.
आवश्यक दस्तऐवज अपलोड करा आणि सबमिट करा.
अपडेटचा SRN क्रमांक मिळेल, ज्याच्या सहाय्याने स्थिती तपासता येईल.

. ऑफलाइन पद्धत:
जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन आधार अपडेट/नोंदणी फॉर्म भरावा.
आवश्यक कागदपत्रांसह तो फॉर्म सादर करावा.
बायोमेट्रिक माहितीची गरज असल्यास ती द्यावी.
सुरुवातीला ही मोफत सुविधा 14 डिसेंबर 2024 पर्यंत होती, मात्र UIDAI ने ती वाढवून 14 जून 2025 केली आहे. या तारखेपर्यंत अपडेट न केल्यास ऑनलाइन अपडेटसाठी ₹25 आणि आधार केंद्रात जाऊन अपडेट केल्यास ₹50 शुल्क आकारलं जाईल.

कोणत्या कागदपत्रांची गरज लागेल?
ओळखपत्राचा पुरावा (PoI): पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी.
पत्त्याचा पुरावा (PoA): वीज बिल, बँक पासबुक, भाडे करार, राशन कार्ड.
जन्मतारीख (DoB): जन्म प्रमाणपत्र, शाळेचं प्रमाणपत्र.