हे फायदे मिळवण्यासाठी काही अटी
घराची रजिस्ट्रेशन संपूर्णपणे स्त्रीच्या नावावर व्हावं लागतं.
काही राज्यांमध्ये संयुक्त मालकी हक्क असतानाही अंशतः सवलत मिळते.
जर महिला नावावर घर घेतल्यानंतर काही वर्षात ते दुसऱ्याच्या नावावर केलं, तर सवलत रद्द होऊ शकते.
याशिवाय मिळणारे इतर फायदे
अनेक बँका महिला गृहखरेदीदारांसाठी कमी व्याजदराने गृहकर्ज देतात.
घरावर महिला नाव असल्यास पुढील काळात उत्पन्नाच्या आधारावर टॅक्समध्ये सवलत घेण्यासही मदत होते.
महिला सबलीकरणाला चालना मिळते आणि घरावर त्यांचा हक्क वाढतो.
अशी करा रजिस्ट्रेशन
घर खरेदीकरताना रजिस्ट्रेशनसाठी जाण्यापूर्वीच निर्णय घ्या की, मालकी हक्क कोणाच्या नावावर हवा. दस्त नोंदणी दरम्यान महिला खरेदीदार असल्याचे नमूद करा आणि संबंधित कागदपत्रांसह सवलतीसाठी अर्ज करा.