हे कागदपत्रे आवश्यक..
अर्ज करण्यासाठी नागरिकांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्जासोबत रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल.
कुठे आणि कसा कराल अर्ज?
सर्वातप्रथम, राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर ‘रेशन कार्ड नवीन योजना 2025’ या पर्यायावर क्लिक करा.
रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर फक्त अर्ज सबमिट करा.
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहीण योजना’ देखील चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात दिले जात आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळत आहे. आता सरकारकडून सर्वसामान्य कुटुंबाना अन्नधान्यासह अर्थसाह्य केले जाणार आहे. या योजनेमुळे गरिबांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.