योजनेचे वैशिष्ट्ये
दहावी किंवा बारावीत ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना १०,००० रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
शिष्यवृत्ती फक्त बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त २ मुलांना दिली जाते.
या योजनेचा उद्देश कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न.
शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता
विद्यार्थ्याचे पालक महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असावेत.
विद्यार्थी आणि त्याचे कुटुंब महाराष्ट्राचे नागरिक असावे.
अर्जदाराला दहावी किंवा बारावीत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.