जॉब कार्डचा नंबर मिळाल्यांनतर ते डाऊनलोड कसे करायचे, ते पाहूया….
सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या narega या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
या ठिकाणी Generate Reports या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर दिलेल्या राज्यांपैकी आपले राज्य निवडा. (उदा. महाराष्ट्र)
पुढील व्हिडिओमध्ये काही पर्याय दिले असतील. जसे वर्ष, तालुका, ब्लॉक, पंचायत.
ही सर्व माहिती भरल्यानंतर Proceed या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल, यात अनेक पर्याय दिसतील. यातील R1 जॉब रजिस्ट्रेशन (R1 job registration) या कॉलम मध्ये जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर (Job card/employment register) यावर क्लिक करा.
card/employment register) यावर क्लिक करा.
त्यात तुमच्या गावातील जॉब कार्ड बनवलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचे जॉब कार्ड नंबर दिसेल.
त्यात तुमचे नाव शोधा. तुमच्या नावासमोर तुमचा जॉब कार्ड नंबर दिसेल. तो तुम्ही सुरक्षितपणे लिहून ठेवा.
तसेच ते कार्डही डाउनलोड करता येईल.