योजनेचा लाभ कोणाला मिळणार
लेक लाडकी या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. ज्या नागरिकांकडे ऑरेंज किंवा पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाचे उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार आहे. जर तुम्हाला जुळ्या मुली असतील तर दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.