ही कागदपत्रे आवश्यक
डोमिसाइल-डॉगरी दाखल्यासाठी…
तलाठ्यांचा रहिवासी दाखला, आधारकार्डची झेरॉक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाइड, जन्माचा दाखला.
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी…
तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्डची झेराक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, वडिलांचा फोटो
जातीच्या दाखल्यासाठी…
तलाठी-सरपंच यांचा दाखला, मुलाचा व वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी व वडिलांचे आधारकार्ड, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला.

राशनकार्ड काढण्यासाठी..
तलाठी-सरपंच यांचा दाखला, वडिलांचा उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, गॅस सिलिंडरचे कागदपत्र, कुटुंबप्रमुखाचे दोन फोटो.
प्रवेश अर्ज भरताना ही घ्या काळजी…
कोणत्या शाईचे पेन वापरावे, कोणत्या भाषेत अर्ज भरावा, या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. त्यानंतर योग्य पद्धतीने अर्ज भरावा.
प्रवेशासाठीचा अर्ज भरताना गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत ठेवावे. ऑफलाइन अर्ज भरताना अर्जासोबत कागदपत्रे जोडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीही सोबत असाव्यात.
अर्ज भरताना काही चूक होऊ नये, यासाठी तुम्ही आधी अर्जाची झेरॉक्स कॉपी काढून ती भरू शकता आणि त्यानंतर मूळ अर्ज भरा. ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून एका फोल्डरमध्ये किंवा पेनड्राइव्हमध्ये घेऊन सोबत ठेवा.