मोफत पिठाची गिरणी योजनाची उद्दिष्टे

* महिलांचे आर्थिक सक्षमीकरण : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांचे सशक्तीकरण करणे.

* ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना : ग्रामीण भागात लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे.

* रोजगार निर्मिती : महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

* सामाजिक समता : अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देऊन सामाजिक समता आणणे.

* कौटुंबिक उत्पन्न वाढवणे : महिलांच्या उत्पन्नातील वाढीमुळे कुटुंबाचे एकूण उत्पन्न वाढवणे.

योजनेचे पात्रता निकष काय?

* अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

* अर्जदार महिलेचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे.

* महिला अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असावी.

* कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

* विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल.

* अर्जदार महिलेच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे.

योजनासाठी आवश्यक कागदपत्रे

* अर्जदार महिलेच्या आधार कार्डची प्रत

* अनुसूचित जाती किंवा जमातीचे प्रमाणपत्र.

* कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला.

* कुटुंबाच्या रेशन कार्डची प्रत.

* महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.

* बँक खात्याचा तपशील पासबुक किंवा बँक स्टेटमेंटची प्रत.

* अर्जदार महिलेचा अलीकडील फोटो.

* दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र (असल्यास): BPL कार्डची प्रत.

* कोटेशनः पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन.

येथे करा अर्ज

*अर्जदार महिलेने स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या * कार्यालयात जाऊन अर्ज भरावा.

* सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करावा.

* वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

* अर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्रता तपासली जाईल.

* अर्ज मंजूर झाल्यास, संबंधित महिलेला अनुदान मंजूर केले जाईल.

* मंजूर अनुदान थेट अर्जदार महिलेच्या बँक खात्यात जमा केले जाईल.

हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने २०२४-२५ या वर्षात जि. प. सेस व विशेष घटक योजनेतून १०६ लाभार्थ्यांना पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. पिठाच्या गिरणीमुळे लाभार्थी आत्मनिर्भर बनले आहेत.