मोबाईलवरच सर्वेक्षण करा

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर सर्वेक्षण करू शकता. त्यासाठी तुम्हाला “Awaas Plus” नावाचं अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. हे अ‍ॅप हिंदी, इंग्रजी आणि इतर स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे वापरणं खूप सोपं आहे.

सर्वेक्षण करताना तुमच्याकडे आधार कार्ड आणि आधार क्रमांक असणं आवश्यक आहे. अ‍ॅपमध्ये चेहरा ओळखून ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली जाते.

अर्ज करताना एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा

फॉर्म भरताना एक प्रश्न विचारला जाईल “कुटुंबातील कोणाच्या नावावर अर्ज करायचा?”

जर तुम्ही कुटुंबातील महिलेसाठी अर्ज केला, तर तुम्हाला या योजनेत प्राधान्य मिळू शकतं. त्यामुळे शक्यतो महिलांचे नाव अर्जात भरा.

फॉर्ममध्ये भरायची माहिती

1. आधार क्रमांक (e-KYC साठी)

2. राज्य, जिल्हा, गाव याची माहिती

3. कुटुंब प्रमुखाचं नाव

4. जॉब कार्ड क्रमांक (जर असेल तर)

5. कुटुंबातील सदस्यांची माहिती

6. e-KYC पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक पिन नंबर मिळेल, ज्याच्या आधारे तुम्ही अ‍ॅपमध्ये लॉगिन करू शकता.

आता तुम्ही पीएम आवास योजना अंतर्गत घर मिळवण्याचा सर्वात उत्तम संधी घेऊ शकता. कोणत्याही विलंबाशिवाय, लवकरात लवकर सर्वेक्षण करा, त्यात दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करा आणि अर्ज भरून आपला घर मिळवण्याचा मार्ग सोपा करा!

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा