रास्त भाव दुकानावर (Ration Shop) : रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन आपल्या दुकानावर जा, त्यानंतर बायोमेट्रिक मशीनवर अंगठ्याचा ठसा द्या. तसेच तुमची ई-केवायसी लगेच पूर्ण होईल.
Mera KYC App द्वारे (मोबाईल अॅप) : सर्वात प्रथम Google Play Store किंवा Apple App Store वरून ‘Mera KYC’ अॅप डाउनलोड करा. रेशन कार्ड आणि आधार क्रमांक भरून ओटीपी व्हेरिफिकेशन करा. गरज भासल्यास जवळच्या सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी करा
महा ई-सेवा केंद्र / CSC केंद्रावर : जवळच्या CSC किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक व आधार पडताळणीसह ई-केवायसी पूर्ण करा.
आधार आणि रेशन कार्डवरील नावामध्ये कोणतीही विसंगती असल्यास ती तात्काळ सुधारावी
– ई-केवायसी वेळेत पूर्ण केली नाही तर शिधा थांबू शकतो
– प्रक्रिया यशस्वी झाल्यावर पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही