हे काम अगदी सोपं आहे. तुम्ही एकदा तुमच्या गॅस एजन्सीच्या कार्यालयात भेट द्या. तिथे तुमचा ग्राहक क्रमांक ( Customer ID ) आणि मोबाईल नंबर देऊन तुमचं नंबर अपडेट करण्याची विनंती करा. काही मिनिटांतच तुमचा नवीन मोबाईल नंबर त्यांच्या सिस्टिममध्ये नोंदवला जाईल.
मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुम्ही पुन्हा सहजतेने घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करू शकता. त्यामुळे मोबाईल नंबर लिंक करून ठेवणं खूप गरजेचं आहे.
नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलला तर काय कराल ?
जर तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेतला असेल किंवा जुना नंबर बंद झाला असेल, तर लगेच गॅस एजन्सीला नवीन नंबर अपडेट करून द्या. यामुळे पुढे कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमचं गॅस बुकिंग सतत सुरळीत राहील