आवश्यक कागदपत्रं
लग्नानंतर आधार कार्डमध्ये आडनाव बदलण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि प्राथमिक दस्ताऐवज म्हणजे लग्न प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र तुमचं विवाह झाल्याचा कायदेशीर पुरावा असतो. तुम्ही आडनाव बदललं आहे याचं अधिकृत समर्थन करतो.

स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय?
तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रावर भेट द्यावी लागेल.
तिथे एक फॉर्म भरावा लागेल, त्यात तुमचं नाव, आधार क्रमांक आणि अन्य तपशील असतील.
या फॉर्मसोबत तुमचे आवश्यक कागदपत्र (विवाह प्रमाणपत्र) जोडावे लागतील.
सत्यापनासाठी कागदपत्रांची मूळ प्रत देखील सोबत घेऊन जावी लागेल.
केंद्रावर बायोमेट्रिक माहिती (बोटांचे ठसे, डोळ्याचे स्कॅन) घेण्यात येईल आणि नवीन फोटो काढण्यात येईल.
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं आधार कार्ड अपडेट केलं जातं.