स्वर्णिमा योजनेसाठी कोण असेल पात्र?
अर्जदार महिला असावी
अर्जदाराचे वय वर्षे १८ ते ५५ या दरम्यान असावे
महिलेची स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची तयारी असावी
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे
स्वर्णिमा योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात?
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
शिधापत्रिका
रहिवासी प्रमाणपत्र
अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो
स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
इच्छुक महिलांनी राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात जाऊन स्वर्णिमा योजनेचा अर्ज भरावा.
अर्जामध्ये व्यवसायाची आवश्यक माहिती, संकल्पना आणि प्रशिक्षणाची गरज असल्यास ते नमूद करा
अर्ज भरून राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर होईल.