दहावी- बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहे. यासाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा हॉल तिकिट नंबर आवश्यक आहे. हा नंबर असेल तरच तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे तुमचे हॉल तिकीट शोधून ठेवा.
सर्वप्रथम तुम्हाला mahresult.nic.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला तिथे HSC Result 2025 हा ऑप्शन दिसेल.
यानंतर तुमचा सीट नंबर टाका. नंतर आईचे अचूक नाव टाका.
यानंतर तुम्हाला वेबसाइटवर तुमची मार्कशीट दिसेल. ही मार्कशीट तुम्ही डाउनलोड करु शकतात.