पीएम विद्यालक्ष्मी या योजनेत काहीही तारण न ठेवता हमीशिवाय कर्ज दिले जाणार आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल असणार आहे.यामध्ये सर्वसाधारणपणे १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जातात. या कर्जाची परतफेड तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १ वर्षाच्या कालावधीनंतर करु शकतात.
या योजनेसाठी तु्म्ही विद्यालक्ष्मी पोर्टलवर जा. त्यानंतर लॉग इन करा आणि शिक्षण कर्जावर क्लिक करा. यानंतर तुम्ही विविध बँकांच्या कर्जाचे व्याज बघून अर्ज करा.