असे चेक करा स्टेट्स
सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.
या ठिकाणी Beneficiary Status असा पर्याय दिसेल.
हे स्टेटस पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबरने देखील पाहू शकता.
यात तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता.
मोबाईल नंबर टाकल्यास आपल्याला ओटीपी पाठवला जाईल.
मोबाईलवर आलेला ओटीपी आणि वर दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकायचा आहे.
यानंतर गेट डेटा या बटनावर क्लिक करायचं आहे.
यानंतर लागलीच आपल्यासमोर शेतकऱ्याची सर्व माहिती उपलब्ध होईल.
जसे, नाव, पत्ता, यापूर्वीचे हफ्ते आलेले आहेत का? आले नसतील तर का आले नाहीत, याची माहिती आपल्याला दिसेल.