तुम्हाला यासाठी दर महिन्याला म्युच्युअल फंडच्या इक्विटी स्कीममध्ये गुंतवणूक करावी लागेल.तुम्ही एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंडमध्ये गुंतवणूक करु शकतात. हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. यामध्ये तुम्ही लार्जकॅप आणि मिडकॅप दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत आतापर्यंत १३.३३ टक्के रिटर्न मिळाला आहे. या योजनेत कमीत कमी ३५ टक्के फंड हा लार्जकॅप स्टॉकमध्ये असणे गरजेचे आहे.याचसोबत ३५ टक्के रक्कम ही मिडकॅपमध्ये गुंतवलेली असावी.एसबीआय लार्जकॅप आणि मिडकॅप फंड वेगवेगळ्या क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. या फंडमध्ये इच्छेनुसार ३० टक्के निधी गुंतवण्याचे स्वातंत्र्य आहे. फंड ३० टक्के रक्कम स्मॉलकॅप स्टॉक, डेट इन्स्ट्रुमेंट्स, मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकतात.या योजनेची सुरुवात १९९३ रोजी झाली होती.१० हजार रुपयांचे ३२ वर्षात ६.७५ कोटी रुपये झालेया योजनेत जर तुम्ही जर महिन्याला १०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला ६.७५ कोटी रुपये मिळू शकतात. हा १५.७१ टक्के परतावा आहे. या योजनेत १० ते १५ वर्षांचा परतावा सरासरी १५ टक्के आहे. ५ वर्षांचा परतावा हा १८.४४ टक्के आहे. तर तीन वर्षांचा परतावा १३.६५ टक्के आहे.
एसबीआय म्युच्युअल फंड ही देशातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंनी आहे.यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो.