सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच www.cbse.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेतसीबीएसईच्या या भरती मोहिमेत २१२ रिक्त पदे भरती केली जाणार आहे. त्यातील १४२ पदे ही सुपरिटेंडेंट पदासाठी रिक्त आहेत.त्यातील ७० पदे ही ज्युनिअर असिस्टंट पदासाठी आहे.
सुपरिटेंडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. ज्युनिअस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे गरजेचे आहे.
ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असावे. तर सुपरिटेंडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे असावे.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.